Dhyan ani tyache fayde - ध्यान आणि त्याचे फायदे

Ticker

6/recent/ticker-posts

Dhyan ani tyache fayde - ध्यान आणि त्याचे फायदे


 

ध्यान आणि त्याचे फायदे


मागील प्रकरणात, आपण प्राणायाम केल्यास आपल्या शरीराला आजारांपासून मुक्त करण्यास आणि एकूणच शरीर सुधारण्यास कशी मदत करू शकते याचा शोध घेतला. मागे दिलेल्या क्रिया आणि तंत्रांचा सराव करत राहू या. आपल्याला ध्यान, दोन आवश्यक घटक देते: पहिले म्हणजे मनाला शून्यतेच्या स्थितीत आणून ध्यानाची स्थिती प्राप्त करणे आणि दुसरे म्हणजे कुंडलिनी उर्जेचे जागरण. ही कुंडलिनी जागरण व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते. पण हे तितके सोपे नाही, कुंडलिनी तत्व आत्मसात करण्यास पूर्व प्राथमिक अभ्यास असणे गरजेचे आहे. हा अभ्यास म्हणजेच प्राणायामाची प्राथमिक क्रिया येणे आवश्यक आहे. तुमचे मन ध्यानात खोलवर बुडत असताना कुंडलिनी उर्जेशी तुमची जवळीक वाढते. तथापि, पुढे जाण्यापूर्वी, प्रथम मनाला शून्यतेच्या स्थितीत आणणे अत्यंत महत्वाचे आहे. या पायाशिवाय, पुढील प्रगती शक्य नाही. मागील प्रकरणात आपण मनाला या स्थितीत कसे मार्गदर्शन करायचे ते शिकलो, म्हणून आपण थोडक्यात पुनरावलोकन करूया.

 ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश करण्यासाठी, मन स्थिर आणि शांत असले पाहिजे. दररोजचे विचार काही काळ बाजूला ठेवले पाहिजेत. तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्याव्या लागतील, त्यावर नियंत्रण ठेवण्यास शिकावे लागेल आणि त्यासाठी मर्यादा निश्चित कराव्या लागतील. यासाठी शांत आणि एकांत ठिकाणी बसणे आवश्यक आहे. जिथे दररोजचे विचार कमी करता येतील. विचार मनात येणे हि नैसर्गिक क्रिया आहे किंवा तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे, हे म्हणणे स्वाभाविक होईल. प्राणायामाच्या क्रियेत या विचारांना प्रतिकार न करता परवानगी द्या, कारण हे विचारांचे चक्र आपल्याला थोपवता येऊ शकत नाही. मनाला तशी सवयच झालेली असते. परंतु प्राणायाम करताना या विचारांना हळूवारपणे कमी करण्याचा सराव केला पाहिजे. प्रयत्न सुरू ठेवा - विचार ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि त्यांना दाबणे कठीण आहे, परंतु आपले प्राथमिक ध्येय म्हणजे मनाला हळूहळू शिस्त लावणे, ते स्थिरतेकडे नेणे. हे आपण प्राणायामातून आत्मसात करू शकतो.

प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत, काही वेळेस आपली धांदल उडते. कोणता प्राणायाम कसा करावा? पण सोपा प्रकार आपण येथे पाहू. या मध्ये डावी कि उजवी नाकपुडी वापरावी हा विचार नाही, साधा सरळ श्वासाचा व्यायाम आपण करूयात,  दोन्ही नाकपुड्यांचा वापर येथे करता येतो.

सुरुवातीला आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया. श्वास दिवसातले २४ तास अविरत चालू असतो. आत आणि बाहेर हि क्रिया सतत चालू असते. आपण बैठकीत प्रथम श्वासावर लक्ष ठेऊन असावे. श्वासाची आत बाहेर होणारी क्रिया न्याहाळावी.

या प्राणायामास सुरुवात करताना, आपले मन शांत असणे महत्वाचे आहे. खोलीत शांतता असावी. बसताना आपली पाठ भिंतीस सरळ ठेवावी. भिंतीचा आधार घ्यावा, एखादी उशी पाठ आणि भिंत यामध्ये ठेवावी, त्यामुळे मणक्यावर ताण येणार नाही. 

प्रथम क्रिया :

दृष्टी सरळ ठेवावी, श्वासाच्या आत बाहेर होणाऱ्या क्रियेवर लक्ष ठेवा. एक दोन वेळा दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यावा. थोडे स्वस्थ वाटल्यावर, १, २, ३, ४, ५, ६, ७,. . . . . . १० अंका पर्यंत मोजून श्वास आत घ्यावा. आणि सोडून द्यावा. प्राथमिक अवस्थेत १ ते १० अंका पर्यंत श्वास मोजून आत घेण्याची क्रिया करा, नंतर शक्य असेल तर १५ पर्यंत अंक वाढवा. या क्रिया सुरुवातीस केल्यामुळे, आपल्याला श्वास अंकाबरोबर खेळवता येतो. अंका बरोबर श्वास आत घेण्याची आपल्याला सवय लागत जाते.

दुसरी क्रिया : 

श्वास आत घ्या   १,  २,  ३,  ४,  ५,  ६,  ७,  ८,  ९,  १० अंका पर्यंत.
श्वास आत घेताना तो वर-वर जात असावा, त्यामुळे तो डोक्या-पर्यंत जातो. तेथे थोडा वेळ कुंभक म्हणजे रोखून धरा. आणि सोडून द्या. 
याच क्रिया परत करा. तुम्हाला जमेल ठेवढा वेळ या क्रियेस द्या. रोज १० ते १५ मिनिटे हा श्वासाचा व्यायाम करावा. तुम्हाला फरक जाणवेल, स्फूर्ती येईल आणि ताजे-तवाने वाटेल. 

आता तिसरी क्रिया :

वरील प्रमाणेच श्वास अंक मोजून आत घ्या, डोक्या-पर्यंत श्वास पोहोचल्यावर तेथे ८ ते १० सेकंद मोजून रोखून धरा, आणि हळू-हळू श्वास सोडून द्यावा. परत -परत या क्रिया केल्यास, डोके जड होत जाईल. बाहेरील विचार कमी होत जातात. मन शांत होत जाते.


 

निष्कर्ष: 

या प्राणायाम मुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. मनातील मरगळ नाहीशी करते, स्फूर्ती वाटते , विचार कमी होऊन, शांतता लाभते.  म्हणजे आपल्याला ध्यानस्थ होण्यास मदत होते. मन ध्यान स्थितीत पोहोचते.

 



 

 

              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या